Sunday, December 26, 2010
मराठी चित्रपटसृष्टीचा 'सुपरस्टार" अमोल कोल्हे..
ह्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या "ऑन ड्युटी २४ तास" आणि "आघात" सिनेमाला प्रेक्षकांनी गर्दी करत तुफान प्रतिसाद दिल्याने अमोल कोल्हे आता सुपरस्टार बनले आहेत.. पुण्यातील "प्रभात" मध्ये अमोलच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या शोला झालेली गर्दी आणि अमोलला सगळ्यांनी घातलेला गराडा ह्या वरून "अमोलकी तो निकाल पडी.." असेच म्हणावे लागेल...पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणारे "राजमाता जिजाऊ" आणि "ठेंगा" हे चित्रपट हि असेच यशस्वी होतील असा अमोल ह्यांना विश्वास आहे..अमोल ह्यांच्या जगभर पसरलेल्या चाहत्यांचे आम्हाला येणारे शेकडो ई मेल्स अमोल ह्यांना सुपरस्टार बनवितात..अमोल ह्यांना शुभेच्छा..
-स्वप्नील कदम,पुणे
Friday, December 17, 2010
"डॉक्टर" अमोल कोल्हेंचा "आघात" येतोय..
Friday, November 26, 2010
"करण बेदी" अमोलचा आगामी चित्रपट "ऑन ड्युटी २४ तास"
सुप्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित "ऑन ड्युटी २४ तास" ह्या विनोदी चित्रपटात अमोल कोळे हे करण बेदी ह्या पंजाबी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत आहेत..अतिशय वेगळ्या धाटणीची हि भूमिका अमोल कोल्हे सकारात आहेत...ते प्रथमच एक विनोदी भूमिका करत आहेत..अमोल कोल्हे ह्यांना "ऑन ड्युटी २४ तास" साठी www.dramolkolhe.blogspot.com कडून हार्दिक शुभेच्छा...!!!
अधिक माहितीसाठी भेट द्या..http://onduty24taas.blogspot.com/
- स्वप्नील (२६/११ स्मरण ब्लॉग पोस्ट)
Saturday, October 16, 2010
Saturday, September 18, 2010
18th September - Dr.Amol's Birthday..
Wish You A Very Very Happy Birthday Mr.Amol Kolhe...
wish him through..
-Swapnil Kadam.
Wednesday, August 18, 2010
Dr.Amol Kolhe In Movie RAJMATA JIJAU...
Dr.Amol Kolhe will be in the role of chhatrapati shivaji maharaj in marathi movie "rajmata jijau"
where dr,smita deshmukh is in the lead role of "jijau" & Milind Gunaji as "Shahaji Maharaj"...
mr.sharad nimse (producer) & famous marathi movie director yashwant bhalkar spoke to www.dramolkolhe.blogspot.com today...
0n 24th august 2010, jijai films, shirdi (production house of Rajmata jijau") is going to launch website of the movie www.rajmatajijau.com in pune...
Production House is very excited about this project...Mr.Pratap Gangawane,Madan Patil,Babasaheb Saudagar,Shashank Powar,Kailash Kher,Shankar Mahadevan,Suresh Wadkar are working for the success of this project..
movie will be released in December of this year..
- swapnil kadam, pune..
Tuesday, August 10, 2010
Dr.Amol Kolhe Fans Club
Hello Friends & Dr.Amol's Fans...
We are going to create Dr.Amol Kolhe's fans club..Mr.Suraj Kadam From Tulsa (US) will be the Founder President of Dr.Amol Kolhe Fans Club...This Fans Club will work on Internatioanal Level to gather amol's fans...
Swapnil Kadam, Pune-Hingoli.
First 20 Member's Names will be displayed on this blog...so email us...For membership...
amolfans@gmail.com
THANKS...
Sunday, July 11, 2010
fakt amol kolhech...shivaji..vote for him..
Dr.Amol: (sent from orkut mobile to swapnil..)
type mt(space)Amol Kolhe and send it to 58888
Wednesday, June 9, 2010
डॉ. अमोल कोल्हेच....!!!!
शिवाजी महाराजांवर इंग्रजी सिनेमा
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबईछत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, मालिका निघाल्या, मराठी सिनेमे आले. पण या जाणत्या राजाचे महत्त्व उभ्या जगाला कळावे यासाठी आता इंग्रजी सिनेमा येणार आहे. महत्वाकांक्षी कलादिग्दर्शक नितीन देसाई हा भव्यदिव्य प्रकल्प वास्तवात आणणार आहेत.महाराष्ट्राची अस्मिता असणा-या शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्राबाहेर अनेक प्रवाद आहेत. या सा-या प्रवादांना उत्तर देण्यासाठी त्यांच्या भाषेतून महाराजांचे कर्तृत्त्व मांडणे आवश्यक आहे. यासाठीच ' ग्रेट वॉरियर राजा शिवछत्रपती ' या नावाने हा सिनेमा बनणार असून तो इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमधून प्रदर्शित होईल.एखाद्या साहसी हॉलिवूडपटाप्रमाणे यात चित्रीकरण करण्यात येणार असून त्यासाठी कोट्यवधींचे बजेट आखण्यात आल्याचे कळते. त्यासाठी हॉलीवूडमधून विशेष तंत्रज्ञानांना बोलावण्यात येणार आहे. येत्या २४ तारखेला ' राजा शिवछत्रपती ' या मालिकेच्या डीव्हीडी प्रकाशन सोहळ्यात या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.या सिनेमासाठी आवश्यक तेथे भव्यदिव्य सेट उभारण्यात येईलच. पण या सेट्सप्रमाणे महाराजांच्या कर्तृत्त्वाची साक्ष देणारे किल्ल्यांवर या सिनेमाची चित्रीकरण करण्याची देसाई यांची मनिषा आहे. त्यासाठी ते सरकार आणि पुरातत्त्व खात्याची परवानगीही घेणार आहेत.
' राजा शिवछत्रपती ' या मालिकेत महाराजांची भूमिका गाजवणारे डॉ. अमोल कोल्हेच या सिनेमात महाराजांची भूमिका करतील. तर चित्रपटांच्या लेखनप्रक्रियेत कवी गुलजार यांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शिवाजीराजांवर येतोय आंतरराष्ट्रीय चित्रपट
-
Wednesday, June 09, 2010 AT 12:45 AM (IST)
संतोष भिंगार्डे - सकाळ वृत्तसेवामुंबई -
'हर हर महादेव... जय भवानी...' असा एल्गार पुकारत मोगलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अख्ख्या जगासमोर ठेवण्यासाठी कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई सरसावले आहेत. छत्रपतींच्या जीवनावर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांत एक भव्यदिव्य चित्रपट बनविण्याचे शिवधनुष्य पेलायला ते सज्ज झाले आहेत. "ग्रेट वॉरियर राजा शिवछत्रपती' असे चित्रपटाचे नाव असून बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडच्या तंत्रज्ञांचे सहकार्य यासाठी घेण्यात येणार आहे. येत्या 24 जून रोजी याबाबतची घोषणा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूडचे दिग्गज गीतकार गुलजार यांनी आपल्या चित्रपटासाठी लेखन करावे, अशी देसाई यांची इच्छा असून याबाबत ते त्यांना लवकरच गळ घालणार आहेत.नितीन देसाई यांनी "चंद्रकांत प्रॉडक्शन' बॅनरखाली "राजा शिवछत्रपती' मालिका बनविली होती. अल्पावधीतच ती घरोघरी कमालीची लोकप्रिय ठरली होती. या मालिकेची आठवण रसिकांच्या मनात सदैव राहावी, याकरिता ते एक डीव्हीडीही काढणार आहेत. याशिवाय "ई टीव्ही मराठी'साठी त्यांनी "श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' नावाची मालिकाही बनविली आहे. 14 जूनपासून ती प्रसारित केली जाणार आहे. एकीकडे तिचे काम सुरू असताना लवकरच देसाई संभाजी महाराजांवरही एक मालिका काढणार आहेत. त्यानंतर लगेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील अतिशय भव्यदिव्य स्वरूपातील हिंदी व इंग्रजी भाषेतील चित्रपटाच्या कामास ते सुरुवात करणार आहेत. नितीन देसाई म्हणाले, 'आमच्या संभाजी महाराजांवरील मालिकेत डॉ. अमोल कोल्हे संभाजींची भूमिका साकारणार आहेत. शिवाजींची भूमिकाही पुन्हा त्यांच्याकडेच देण्याचा आमचा विचार आहे. छत्रपतींचा इतिहास सगळ्यांना परिचित व्हावा, याकरिता आमचा हा प्रयत्न आहे. चित्रपटाचे चित्रीकरण गड-किल्ल्यांवर करण्यासाठी सरकार आणि पुरातत्त्व खात्याची परवानगी घेणार आहे. सेट्सपेक्षा प्रत्यक्ष गड आणि किल्ल्यांवर जाऊन चित्रीकरण करणार आहोत. चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे बजेट आम्ही आखलेले आहे.''लेखनासाठी गुलजारना गळआपल्या धडाकेबाज प्रवासाबाबत देसाई म्हणाले, 'मला इतिहासाची खूप आवड आहे. त्यामुळेच इतिहासाचे एकेक पान मी उलगडत जाणार आहे. "राजा शिवछत्रपती' मालिका आम्ही 240 भागांची बनविली होती. आता चित्रपट काढणार आहोत. त्याचे लेखन प्रताप गंगावणे करणार आहेत. याशिवाय गुलजार यांनी लेखन करावे, अशी माझी इच्छा आहे. त्याबाबत त्यांच्याशी बोलणार आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चित्रपट बनविणार असल्यामुळे हॉलीवूडच्या एका लेखकाची मदतही घेणार आहोत.''
Saturday, May 22, 2010
-
Friday, May 21, 2010
मुंबई - "राजा शिवछत्रपती' या मालिकेत शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारून डॉ. अमोल कोल्हे घरोघरी पोचले होते. ही मालिका आणि त्यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका कमालीची लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा तीच भूमिका साकारायचे ठरविले आहे. "राजमाता जिजाऊ' या चित्रपटात ते छत्रपती शिवाजी महाराज बनलेले आहेत.
निर्मात्या मंदाताई निमसे आणि दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई यांचा जीवनपट "राजमाता जिजाऊ' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे ठरविले आहे. यामध्ये जिजाबाईंची भूमिका सिंदखेडजवळील चिखली गावातील डॉ. स्मिता देशमुख साकारीत आहेत; तर छत्रपती शिवाजी डॉ. अमोल कोल्हे बनलेले आहेत. पुण्याजवळील भोरच्या वाड्यात तसेच पैठण येथे या चित्रपटाचे आतापर्यंतचे चित्रीकरण झालेले आहे. याबाबत दिग्दर्शक यशवंत भालकर म्हणाले, ""अमोल कोल्हे यांची "राजा शिवछत्रपती' ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती.
माझ्या घरची मंडळी ती पाहात होते. त्यांनीच मला तुम्ही शिवरायांच्या भूमिकेसाठी अमोल यांना घ्यावे, असा आग्रह धरला. त्यामुळे अन्य कुणाचा विचार न करता आपण त्यांची निवड केली. कारण एखाद्या नवोदिताची निवड केली असती, तर त्याने त्या भूमिकेला कितपत न्याय दिला असता, असा प्रश्नही माझ्यासमोर होता. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ""खरोखरच "राजा शिवछत्रपती' मालिकेबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. निर्माते नितीन देसाई यांनी उच्च निर्मितीमूल्यांतून ही मालिका बनविली होती. यामध्ये आपण साकारलेली छत्रपतीची भूमिका अवघड होती. ही भूमिकेमुळेच "राजमाता जिजाऊ' हा चित्रपट आपणास मिळाला. त्या मालिकेत आपण एका जाणत्या राजाची भूमिका केली होती. आता या चित्रपटात आदर्श मुलगा आपण बनलो आहोत. पुन्हा शिवाजी महाराज साकारायला मिळाले त्याबद्दल आपणास आनंद आहे.''
posted by- स्वप्नील कदम (मंदाताई निमसे आणि अमोल कोल्हे ह्यांच्या परवानगी वरून..)
original news- संतोष भिंगार्डे - सकाळ वृत्तसेवा..thanks..
अधिक माहितीसाठी - www.rajmatajijau.com
Dr.Amol Kolhe In Marathi Movie "Rajmata JIjau"
भोर, १२ एप्रिल/वार्ताहर
भोर येथील संस्थानकालीन राजप्रासादात ‘राजमाता जिजाऊ’ या संस्कारक्षम सामाजिक व ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. अजून तीन दिवस ते या ठिकाणी चालणार आहे.
शिर्डी येथील जिजाई चित्र संस्थेमार्फत हा चित्रपट निर्माण केला जात आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊंनी श्री शिवाजीमहाराजांना घडविण्यासाठी सारं आयुष्य वेचलं. त्यांच्याजवळ धाडस, मुत्सद्दीपणा, सामथ्र्य हे गुण होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये पत्नी, माता, मुलगी, सून, सासू, आजी, गुरू, मित्र, सखा, न्यायदेवता आणि पालनकर्ता अशा विविध भूमिका प्रसंगानुरूप उभ्या करून श्री शिवाजीमहाराजांना स्वराज्य मिळविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
अशा कर्तृत्वशाली मातृशक्तीचा एक वेगळा आविष्कार आजच्या तरुणाईला आणि महिलावर्गालाही प्रेरणादायी ठरावा, अशारीतीने या चित्रपटात जिजाऊंचे आदर्श चित्रण करण्यात आले आहे.
मदन पाटील यांच्या ‘जिजाऊ साहेब’ या ग्रंथावर आधारित चित्रपटाची कथा व संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहिले आहेत.
शिर्डी येथील अस्तगावमधील सामाजिक कार्यकर्त्यां मंदा शरद निमसे हा चित्रपट निर्माण करीत आहेत. चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांचे शिष्य व चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर हे चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.
जिजाऊंच्या मध्यवर्ती व मुख्य भूमिकेत बुलढाणा येथील विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख काय करीत आहेत. श्री छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भूमिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे आहेत. याशिवाय मिलिंद गुणाजी, राहुल सोलापूरकर यांच्यासह सुमारे १०० अन्य कलाकार सहभागी झाले आहेत. श्रीरामपूरच्या बाबासाहेब सौदागर यांनी गीतलेखन केले आहे. शशांक पवार संगीताची बाजू सांभाळत आहेत. कैलाश खेर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, नंदेश उमप हे गायक यात गाणार आहेत. ऑस्करविजेता ‘स्लॅम डॉग’चे राहुल खंदारे यांच्याकडे निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
श्री शिवछत्रपतींना घडविणाऱ्या जिजाऊमातेची अलौकिक चरित्रकथा या समाजाला आदर्शवत, दिशादर्शक ठरेल व राष्ट्रीय ऐक्याचा संदेश त्यातून मिळेल. घराघरांत जिजाऊ जातील हाच महत्त्वाचा उद्देश या चित्रपटनिर्मितीमागे असल्याचे मनोगत निर्मात्या मंदा निमसे यांनी व्यक्त केले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांत चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. येत्या सप्टेंबपर्यंत हा चित्रपट पूर्ण होईल असे सांगण्यात आले.
भोरच्या राजप्रासादात ‘राजमाता जिजाऊ’चे चित्रीकरण
भोर, १२ एप्रिल/वार्ताहर
भोर येथील संस्थानकालीन राजप्रासादात ‘राजमाता जिजाऊ’ या संस्कारक्षम सामाजिक व ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. अजून तीन दिवस ते या ठिकाणी चालणार आहे.
शिर्डी येथील जिजाई चित्र संस्थेमार्फत हा चित्रपट निर्माण केला जात आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊंनी श्री शिवाजीमहाराजांना घडविण्यासाठी सारं आयुष्य वेचलं. त्यांच्याजवळ धाडस, मुत्सद्दीपणा, सामथ्र्य हे गुण होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये पत्नी, माता, मुलगी, सून, सासू, आजी, गुरू, मित्र, सखा, न्यायदेवता आणि पालनकर्ता अशा विविध भूमिका प्रसंगानुरूप उभ्या करून श्री शिवाजीमहाराजांना स्वराज्य मिळविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
अशा कर्तृत्वशाली मातृशक्तीचा एक वेगळा आविष्कार आजच्या तरुणाईला आणि महिलावर्गालाही प्रेरणादायी ठरावा, अशारीतीने या चित्रपटात जिजाऊंचे आदर्श चित्रण करण्यात आले आहे.
मदन पाटील यांच्या ‘जिजाऊ साहेब’ या ग्रंथावर आधारित चित्रपटाची कथा व संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहिले आहेत.
शिर्डी येथील अस्तगावमधील सामाजिक कार्यकर्त्यां मंदा शरद निमसे हा चित्रपट निर्माण करीत आहेत. चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांचे शिष्य व चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर हे चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.
जिजाऊंच्या मध्यवर्ती व मुख्य भूमिकेत बुलढाणा येथील विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख काय करीत आहेत. श्री छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भूमिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे आहेत. याशिवाय मिलिंद गुणाजी, राहुल सोलापूरकर यांच्यासह सुमारे १०० अन्य कलाकार सहभागी झाले आहेत. श्रीरामपूरच्या बाबासाहेब सौदागर यांनी गीतलेखन केले आहे. शशांक पवार संगीताची बाजू सांभाळत आहेत. कैलाश खेर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, नंदेश उमप हे गायक यात गाणार आहेत. ऑस्करविजेता ‘स्लॅम डॉग’चे राहुल खंदारे यांच्याकडे निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
श्री शिवछत्रपतींना घडविणाऱ्या जिजाऊमातेची अलौकिक चरित्रकथा या समाजाला आदर्शवत, दिशादर्शक ठरेल व राष्ट्रीय ऐक्याचा संदेश त्यातून मिळेल. घराघरांत जिजाऊ जातील हाच महत्त्वाचा उद्देश या चित्रपटनिर्मितीमागे असल्याचे मनोगत निर्मात्या मंदा निमसे यांनी व्यक्त केले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांत चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. येत्या सप्टेंबपर्यंत हा चित्रपट पूर्ण होईल असे सांगण्यात आले.
for more information visit- www.rajmatajijau.com - swapnil kadam (source-lok-satta,lok-mat)
पुणे - ''मुलाला घडविण्याची जिद्द जोपासणाऱ्या व त्याच्या कर्तृत्वाने तृप्त होण्याची आस बाळगणाऱ्या प्रत्येक आईमध्ये एक समर्थ जिजाऊ दडलेली असते,'' असे मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या "कादंबरीमय शिवकाल' या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, कुलकर्णी व दिग्दर्शक हेमंत देवधर यांच्या हस्ते झाले. गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ, इतिहासप्रेमी मंडळ व मृण्मयी प्रकाशन यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. वीणा देव व प्रा. विजय देव या प्रसंगी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाल्या, ""मातुःश्री जिजाऊंच्या मनातील स्वातंत्र्याची ऊर्मी, मुलाला घडविण्याची जिद्द, कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता या वृत्ती केवळ अद्वितीय आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात समर्थ स्त्रीत्वाचे दर्शन घडते. शिवछत्रपतींनी आपल्या मातेने दिलेले सर्व संस्कार घेतले. अशीच जिजाऊ प्रत्येक आईमध्ये दडलेली असते. मात्र, आज किती मुलगे शिवबा असतात, याचाही विचार होण्याची गरज आहे.''
डॉ. कोल्हे म्हणाले, ""शिवछत्रपतींच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाचे पैलू आजही पूर्णतः उलगडलेले नाहीत. ते एक चैतन्य आहेत. भूमिका साकारताना त्यांच्यातले माणूसपण कमालीचे भावले.''
posted by- swapnil subhashrao kadam स्वप्नील कदम (source-www.esakal.com)
शिवरायांची महती अवर्णनीय - अमोल कोल्हे
सकाळ वृत्तसेवा
पुणे - ""शिवछत्रपतींच्या कार्याची महती अवर्णनीय आहे. त्यामुळेच साडेतीनशे वर्षे उलटूनही महाराष्ट्राने त्यांना आपल्या हृदयात जपले आहे. "शिवाजी महाराज जन्माला यावेत ते माझ्याच घरात' अशी काळानुरूप बदललेली सर्वसामान्यांची भूमिका आज अनुभवण्यास मिळते,'' अशी भावना प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
वसंतदादा सेवा संस्था व प्रियांकाजी महिला उद्योग संस्था यांच्यातर्फे यंदाचा "राजीव गांधी कला गौरव पुरस्कार' डॉ. कोल्हे यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, संस्थेचे अध्यक्ष संजय बालगुडे, संजीवनी बालगुडे, सुनील महाजन, बालकलाकार मंदार चिकणे या प्रसंगी व्यासपीठावर होते.
डॉ. कोल्हे म्हणाले, ""शिवछत्रपतींची भूमिका साकारल्यामुळे जो सन्मान मिळतो, तो माझा एकट्याचा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. महाराजांची नुसती भूमिका करण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. यापुढे हेच ध्येय ठेवून वाटचाल करणार आहे. पूर्वी "शिवाजी महाराज जन्मावे ते शेजारच्या घरात' अशी भावना आता बदललेली पहावयास मिळते. आज प्रत्येक मुलाला आपण महाराज व्हावे असे वाटणे हीच त्यांच्या कार्याची महती आहे.''
मोरे म्हणाले, ""शिवछत्रपतींचे कार्य इतके समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे, की ते सतत नव्या स्वरूपात समोर आणावे लागणार आहे. आज त्यांची विचारसरणी समोर ठेवून काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे.''
बागवे म्हणाले, ""जाती-धर्माच्या पलीकडे गेलेले आणि सर्वसामान्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत असणारे शिवछत्रपतींनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. कार्यकर्त्यांनी नेहमीच त्यांचा आदर्श ठेवावा. देशाच्या आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन ज्यांनी सतत कार्य केले, अशा राजीव गांधींच्या स्मृतिनिमित्त दिला जाणारा पुरस्कार ही गौरवाची बाब आहे.''
बालगुडे यांना प्रास्ताविक केले.
Wednesday, January 13, 2010
जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘जुन्नरभूषण’ पुरस्कारासाठी यंदा राजा शिवछत्रपती या मालिकेत शिवरायांची भूमिका करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी (तीन ऑक्टोबर) पिंपरी येथे समारंभपूर्वक कोल्हे यांना हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष रोहित खर्गे, संपर्कप्रमुख उल्हास पानसरे यांनी ही माहिती दिली. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी संस्थेची स्थापना झाली असून तीन ऑक्टोबरला संस्थेचा नववा वर्धापनदिन आहे. यानिमित्त संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात शनिवारी दुपारी चार वाजता हा समारंभ होणार आहे. महापौर अपर्णा डोके यांच्या हस्ते डॉ. कोल्हे यांना जुन्नरभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
याप्रसंगी सिनेअभिनेते भरत जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याखेरीज, इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच शाळांचाही गौरव करण्यात येणार आहे, असे खर्गे यांनी सांगितले.
डॉक्टर ते अभिनेता असा माझा प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. स्थिर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातून मी अभिनयाच्या क्षेत्रात आलो आणि आता कुठे या क्षेत्रात प्रेक्षकांच्या प्रेमामुळे स्थिरावतो आहे. अशावेळी अस्थिर असलेल्या राजकारणात जाण्याचा अजिबात विचार नसल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.
नाळे येथील दत्त मंदिर उत्सव कार्यक्रमासाठी आलेल्या डॉ. कोल्हे यांनी 'मटा'शी बोलताना अनेक विषयांवर आपली मते मांडली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. सध्या मी तीन नाटकांच्या व चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचतोय. त्यातून चांगले पटले तर ते लोकांसमोर घेऊन येईन. शिवरायांच्या भूमिकेत प्रेक्षकांनी मला स्वीकारले त्यामुळे माझ्या या प्रतिमेला छेद न देता वेगळे घेऊन येण्याचा माझा प्रयत्न निश्चित राहील.
'शंभूराजे' नाटकाविषयी बोलताना ते म्हणाले की, शंभूराजेची भूमिका साकारणे हे माझ्यातील अभिनेत्याला आव्हान होते. मालिकेतील शिवराय व नाटकातील शंभूराजे हे पूर्णपणे वेगळे होते असे प्रेक्षकांनी नाटक पाहिल्यानंतर सांगितले ही मला दिलेली पोचपावती आहे. माझ्या या वाटचालीत प्रेक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे. मी सध्या मालिकांपेक्षा चित्रपटांवर काम करतोय. हिंदी चित्रपटांच्या अनेक ऑफर मला आल्या असल्या तरी मी त्या नाकारल्या आहेत. तरी त्यात जर दजेर्दार काही आले तर जरूर त्याचा स्वीकार करीन. सध्या शंभूराजे नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून एका महिन्यात नाटकाचे २० प्रयोग होत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.
राजकारणाविषयी चर्चा
राजकारणात यायला मला आवडेल. राजकारण वाईट आहे, असे बोलले जाते. मात्र, सगळेच राजकारणी वाईट असू शकत नाहीत. जर असे असते तर शंभर कोटींच्या देशात यादवी माजली असती, मात्र असे झालेले नाही. देश सुरळीत असून विकासाच्या वाटेवर चालला आहे. म्हणजे राजकारणात काही चांगले माणसे निश्चित आहेत व या चांगल्या माणसांना मदत करण्यासाठी मला राजकारणात जायचे असले तरी परिपक्वता आल्यानंतरच पुढील निर्णय मी घेईन असे त्यांनी अखेरीस सांगितले.