Saturday, May 22, 2010


पुणे - ''मुलाला घडविण्याची जिद्द जोपासणाऱ्या व त्याच्या कर्तृत्वाने तृप्त होण्याची आस बाळगणाऱ्या प्रत्येक आईमध्ये एक समर्थ जिजाऊ दडलेली असते,'' असे मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या "कादंबरीमय शिवकाल' या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, कुलकर्णी व दिग्दर्शक हेमंत देवधर यांच्या हस्ते झाले. गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ, इतिहासप्रेमी मंडळ व मृण्मयी प्रकाशन यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. वीणा देव व प्रा. विजय देव या प्रसंगी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाल्या, ""मातुःश्री जिजाऊंच्या मनातील स्वातंत्र्याची ऊर्मी, मुलाला घडविण्याची जिद्द, कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता या वृत्ती केवळ अद्वितीय आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात समर्थ स्त्रीत्वाचे दर्शन घडते. शिवछत्रपतींनी आपल्या मातेने दिलेले सर्व संस्कार घेतले. अशीच जिजाऊ प्रत्येक आईमध्ये दडलेली असते. मात्र, आज किती मुलगे शिवबा असतात, याचाही विचार होण्याची गरज आहे.''

डॉ. कोल्हे म्हणाले, ""शिवछत्रपतींच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाचे पैलू आजही पूर्णतः उलगडलेले नाहीत. ते एक चैतन्य आहेत. भूमिका साकारताना त्यांच्यातले माणूसपण कमालीचे भावले.''

posted by- swapnil subhashrao kadam स्वप्नील कदम (source-www.esakal.com)

No comments: