Saturday, May 22, 2010

Dr.Amol Kolhe In Marathi Movie "Rajmata JIjau"

भोरच्या राजप्रासादात ‘राजमाता जिजाऊ’चे चित्रीकरण
भोर, १२ एप्रिल/वार्ताहर
भोर येथील संस्थानकालीन राजप्रासादात ‘राजमाता जिजाऊ’ या संस्कारक्षम सामाजिक व ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. अजून तीन दिवस ते या ठिकाणी चालणार आहे.
शिर्डी येथील जिजाई चित्र संस्थेमार्फत हा चित्रपट निर्माण केला जात आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊंनी श्री शिवाजीमहाराजांना घडविण्यासाठी सारं आयुष्य वेचलं. त्यांच्याजवळ धाडस, मुत्सद्दीपणा, सामथ्र्य हे गुण होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये पत्नी, माता, मुलगी, सून, सासू, आजी, गुरू, मित्र, सखा, न्यायदेवता आणि पालनकर्ता अशा विविध भूमिका प्रसंगानुरूप उभ्या करून श्री शिवाजीमहाराजांना स्वराज्य मिळविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
अशा कर्तृत्वशाली मातृशक्तीचा एक वेगळा आविष्कार आजच्या तरुणाईला आणि महिलावर्गालाही प्रेरणादायी ठरावा, अशारीतीने या चित्रपटात जिजाऊंचे आदर्श चित्रण करण्यात आले आहे.
मदन पाटील यांच्या ‘जिजाऊ साहेब’ या ग्रंथावर आधारित चित्रपटाची कथा व संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहिले आहेत.
शिर्डी येथील अस्तगावमधील सामाजिक कार्यकर्त्यां मंदा शरद निमसे हा चित्रपट निर्माण करीत आहेत. चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांचे शिष्य व चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर हे चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.
जिजाऊंच्या मध्यवर्ती व मुख्य भूमिकेत बुलढाणा येथील विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख काय करीत आहेत. श्री छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भूमिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे आहेत. याशिवाय मिलिंद गुणाजी, राहुल सोलापूरकर यांच्यासह सुमारे १०० अन्य कलाकार सहभागी झाले आहेत. श्रीरामपूरच्या बाबासाहेब सौदागर यांनी गीतलेखन केले आहे. शशांक पवार संगीताची बाजू सांभाळत आहेत. कैलाश खेर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, नंदेश उमप हे गायक यात गाणार आहेत. ऑस्करविजेता ‘स्लॅम डॉग’चे राहुल खंदारे यांच्याकडे निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
श्री शिवछत्रपतींना घडविणाऱ्या जिजाऊमातेची अलौकिक चरित्रकथा या समाजाला आदर्शवत, दिशादर्शक ठरेल व राष्ट्रीय ऐक्याचा संदेश त्यातून मिळेल. घराघरांत जिजाऊ जातील हाच महत्त्वाचा उद्देश या चित्रपटनिर्मितीमागे असल्याचे मनोगत निर्मात्या मंदा निमसे यांनी व्यक्त केले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांत चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. येत्या सप्टेंबपर्यंत हा चित्रपट पूर्ण होईल असे सांगण्यात आले.भोरच्या राजप्रासादात ‘राजमाता जिजाऊ’चे चित्रीकरण
भोर, १२ एप्रिल/वार्ताहर
भोर येथील संस्थानकालीन राजप्रासादात ‘राजमाता जिजाऊ’ या संस्कारक्षम सामाजिक व ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. अजून तीन दिवस ते या ठिकाणी चालणार आहे.
शिर्डी येथील जिजाई चित्र संस्थेमार्फत हा चित्रपट निर्माण केला जात आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊंनी श्री शिवाजीमहाराजांना घडविण्यासाठी सारं आयुष्य वेचलं. त्यांच्याजवळ धाडस, मुत्सद्दीपणा, सामथ्र्य हे गुण होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये पत्नी, माता, मुलगी, सून, सासू, आजी, गुरू, मित्र, सखा, न्यायदेवता आणि पालनकर्ता अशा विविध भूमिका प्रसंगानुरूप उभ्या करून श्री शिवाजीमहाराजांना स्वराज्य मिळविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
अशा कर्तृत्वशाली मातृशक्तीचा एक वेगळा आविष्कार आजच्या तरुणाईला आणि महिलावर्गालाही प्रेरणादायी ठरावा, अशारीतीने या चित्रपटात जिजाऊंचे आदर्श चित्रण करण्यात आले आहे.
मदन पाटील यांच्या ‘जिजाऊ साहेब’ या ग्रंथावर आधारित चित्रपटाची कथा व संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहिले आहेत.
शिर्डी येथील अस्तगावमधील सामाजिक कार्यकर्त्यां मंदा शरद निमसे हा चित्रपट निर्माण करीत आहेत. चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांचे शिष्य व चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर हे चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.
जिजाऊंच्या मध्यवर्ती व मुख्य भूमिकेत बुलढाणा येथील विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख काय करीत आहेत. श्री छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भूमिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे आहेत. याशिवाय मिलिंद गुणाजी, राहुल सोलापूरकर यांच्यासह सुमारे १०० अन्य कलाकार सहभागी झाले आहेत. श्रीरामपूरच्या बाबासाहेब सौदागर यांनी गीतलेखन केले आहे. शशांक पवार संगीताची बाजू सांभाळत आहेत. कैलाश खेर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, नंदेश उमप हे गायक यात गाणार आहेत. ऑस्करविजेता ‘स्लॅम डॉग’चे राहुल खंदारे यांच्याकडे निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
श्री शिवछत्रपतींना घडविणाऱ्या जिजाऊमातेची अलौकिक चरित्रकथा या समाजाला आदर्शवत, दिशादर्शक ठरेल व राष्ट्रीय ऐक्याचा संदेश त्यातून मिळेल. घराघरांत जिजाऊ जातील हाच महत्त्वाचा उद्देश या चित्रपटनिर्मितीमागे असल्याचे मनोगत निर्मात्या मंदा निमसे यांनी व्यक्त केले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांत चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. येत्या सप्टेंबपर्यंत हा चित्रपट पूर्ण होईल असे सांगण्यात आले.

for more information visit- www.rajmatajijau.com - swapnil kadam (source-lok-satta,lok-mat)

No comments: