Wednesday, January 13, 2010

डॉ. अमोल कोल्हे यांना ‘जुन्नर भूषण’ पुरस्कार

जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘जुन्नरभूषण’ पुरस्कारासाठी यंदा राजा शिवछत्रपती या मालिकेत शिवरायांची भूमिका करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी (तीन ऑक्टोबर) पिंपरी येथे समारंभपूर्वक कोल्हे यांना हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष रोहित खर्गे, संपर्कप्रमुख उल्हास पानसरे यांनी ही माहिती दिली. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी संस्थेची स्थापना झाली असून तीन ऑक्टोबरला संस्थेचा नववा वर्धापनदिन आहे. यानिमित्त संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात शनिवारी दुपारी चार वाजता हा समारंभ होणार आहे. महापौर अपर्णा डोके यांच्या हस्ते डॉ. कोल्हे यांना जुन्नरभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
याप्रसंगी सिनेअभिनेते भरत जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याखेरीज, इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच शाळांचाही गौरव करण्यात येणार आहे, असे खर्गे यांनी सांगितले.

3 comments:

jayesh said...

congratulations...!!

anushka said...
This comment has been removed by the author.
anushka said...

Heartly Congratulations!!!